पदोन्नतीचा मार्ग मोकळा
नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकार्यांच्या

महसूल विभागाच्या सेवा नियमांत 50 वर्षांनी बदल
मुंबई /21 जुलै : महसूल विभागातील अधिकार्यांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि प्रशासकीय चौकटीत तब्बल पाच दशकांनंतर
बदल घडवून आणण्यात आला आहे. महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रूल्स – आर. आर.) लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सन 1977 नंतर पहिल्यांदाच झालेल्या या व्यापक बदलांमुळेनायब तहसीलदार ते… नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल अधिकार्यांच्या पदोन्नतीतील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता कायमचे मार्गी लागणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाच्या नवीन आकृतीबंधाला आणि सेवाप्रवेश नियमावलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे. 1977 नंतर म्हणजेच तब्बल 50 वर्षांनंतर महसूल रचनेत हा बदल घडवण्यात आला आहे. या निर्णयामुळे विभागातील सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होऊन प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा व पारदर्शकता येईल. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकारी आणि चटई
क्षेत्र निर्देशांक गैरव्यवहाराच्या आरोपांवर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, एसआरएमध्ये वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकार्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाईल. यातील नगरविकास विभागाशी संबंधित तक्रारींची चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, तर महसूल विभागाशी संबंधित चौकशी स्वतः महसूल विभाग करेल आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.





