कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात; पाच जण गंभीर

नवी दिल्ली/23 ऑगस्ट : कोंडागावमध्ये राज्याचे वनमंत्री केदार कश्यप यांच्या ताफ्याचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात मंत्री केदार कश्यप बचावले. मात्र, ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाचे मोठे नुकसान झाले असून मंत्र्यांचे पीए आणि पोलिस जवानांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार कश्यप यांचा ताफा फरसागुडा येथून कोंडागावच्या दिशेने जात होता. जुनवानी परिसरात समोरून आलेल्या भरधाव कारने
प्रथम मंत्र्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर तीच कार ताफ्यात मागून येणार्या फॉलो वाहनावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की ताफ्यातील वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमींना तातडीने कोंडागाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.




