जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळांकडून दिशाभूल

ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा निशाणा

बुलढाणा /16 ऑगस्ट  : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रातील ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून सामाजिक न्यायाच्या लढ्याला ऐतिहासिक यश आल्याचं म्हटलं आहे. तर, यापूर्वी जनगणनेत जात हा विषय नव्हता. पण आता जातनिहाय जनगणनेचा विषय मंजूर झाल्याने एका कमांडवर देशभरातली ओबीसी समाजाची लोकसंख्या हातात येणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर, 2011 च्या जनगणनेत जातीचा कॉलम नव्हता, आता तो कॉलम अ‍ॅड केल्याचं सांगत भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जातनिहाय जनगणनेसाठी आपण 20 वर्षांपासून आवाज उठवला, सन 2010 मध्ये समता परिषदेने याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असेही म्हटले. आता, भुजबळांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी आक्षेप घेतला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button