विनायक विद्यामंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव

मराठी माती विशेषांकाचे प्रकाशन ठरले आकर्षण
अमरावती/16 ऑगस्ट- विनायक विद्यामंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयात भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार तसेच ‘मराठी माती’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टतर्फे संचालित विनायक विद्यामंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला.
आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. विनायक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. रेखा सुर्वे, सौ. आरती निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. यश खोडके, सौ. कल्पना ठाकरे, डॉ. सिमरेला देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘मराठी माती’ विशेषांकाचे प्रकाशनही झाले. सुराज रायबोले, सुमित देवतळे, गौरव गणवीर, दर्शन मंगळकर, ओम रुमाने, सिद्धेश्वरी वाडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. डॉ. पद्माकर टाले, डॉ. शितल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.बॉक्स – रौप्यमहोत्सवी वर्षाला विशेष उजाळामहाविद्यालयाच्या 25 वर्षांच्या वाटचालीनिमित्त संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, ‘मराठी माती’ विशेषांकाचे प्रकाशन आणि देशभक्तीने भारलेले सादरीकरण यामुळे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष रंगत आली.




