मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत
आता आमच्या बाया चपला काढतील; मनोज जरांगेंचा इशारा

मुंबई/16 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी मराठा समाजातील अभ्यासकांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाही, आता आमच्या बाया चपला काढतील असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
अभ्यासकांच्या बैठकीविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते त्यांच्याशी चर्चा केली. हैदराबाद गॅझेटिअरनुसार काय बदल करायचा आणि सातारा, कोल्हापूर, पुणे आणि बॉम्बे गॅझेटिअरनुसार जीआर कसा काढायचा यावर साधक-बाधक चर्चा झाली. मी 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र घेणार. नोंदी मी शोधलेल्यानाहीत, सरकारने शोधल्या आहेत. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडीटी मिळाली पाहिजे. हैदराबाद गॅझेटिअरनुसार मराठवाड्यात संख्येच्या प्रमाणाप्रमाणे प्रमाणपत्र दिले आहेत. याशिवाय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या ज्यांचे व्याज परतावे मिळाले नाहीत त्यांना ते देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.मनोज जरांगे पुढे म्हणाले की, नसरापूर घटनेचा निकाल लवकर लागू शकतो, मग तसा मालेगावच्या लेकीचा निकाल का नाही लागला? संतोष देशमुख, महादेव मुंडे यांची क्रूर हत्या झाली, तिथंपर्यंत निकाल का जात नाही? बावनकुळे आणि शिरसाट प्रमाणपत्र रद्द करत आहेत का? हस्तक्षेप करता येत नाही तर बावनकुळे पत्र देतात कसे? हा मराठ्यांच्या नेत्यांचा अपमान आहे. तुमच्या शिंदेंच्या ऑफिसमध्ये गुपचुप करून येत आहेत, ते तुम्हाला मदत करणार नाहीत. त्यांना फडणवीस जवळ करत नाहीत. फडणवीसांनी जे ओबीसींचे नेते जवळ केलेत तेच केलेत, दुसर्यांना ते पायरी चढू देणार नाहीत. मराठ्यांचे शत्रू त्यांचा आश्रय कसे घेतात? शिंदेंच्या ऑफिसमधील लोक जे बोलत आहेत, मराठ्यांना चाणक्य नीती परळीच्या टोळीने शिकवली आहे.




