मनपावर भगवा झेंडा पुन्हा फडकवूया

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

* विकसित अमरावतीसाठी 51 टक्के बहुमत मिळवून भाजपचा महापौर

* प्रत्येक बूथवर 10 मतं वाढवा – पालकमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’

अमरावती /10 नोव्हेंबर अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, मनपा निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवून अमरावतीत महायुतीची सत्ता आणायची आहे.
नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निवडणुका पार पडतील. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात मनपा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे फारसा वेळ उरलेला नसल्याने आत्तापासूनच तयारीला लागा असे आवाहन बावनकुळे यांनी अभियंता भवनातील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीतून केले. शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांची बैठक शेगाव नाका चौक येथील अभियंता भवनात झाली. या बैठकीत बावनकुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मंत्री संजय कुटे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार राजेश वानखडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी महापौर किरण महल्ले यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव फक्त 19 हजार मतांनी झाला. तो पराभव कमी फरकाने झाला आणि त्यातून आपल्याला शिकण्यासारखे आहे. आगामी मनपा निवडणुकीत अशा चुका पुन्हा होऊ देऊ नयेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने काम केल्यास मनपावर पुन्हा भगवा झेंडा फडकवता येईल. प्रत्येक बूथवर किमान दहा मतं वाढवा. एवढं झालं तरी भाजप आणि महायुतीला मनपात सत्ता मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना ‘घर चलो अभियान’ राबवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांच्या घरी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती द्यावी. तसेच, मनपात सत्ता आल्यास अमरावतीला नागपूरच्या धर्तीवर विकसित करण्याचा आराखडा जनतेसमोर मांडावा. ते म्हणाले की, नागपूरप्रमाणेच अमरावतीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याची योजना जवळपास तयार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मनपात महायुतीचे सत्तेत येणे अत्यावश्यक आहे. या भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचा प्रवेश अभियंता भवनात झालेल्या या बैठकीदरम्यान अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) च्या महिला शहराध्यक्षा शोभना देशमुख, छाया कथलकर, संजय कथलकर, मनसेचे पश्चिम विदर्भ विद्यार्थी आघाडी प्रमुख भूषण फरतोडे, तसेच शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांचे पुतणे देव नेभनानी यांचा समावेश आहे. हे सर्व नेते आपल्या समर्थकांसह पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला.

* भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचा प्रवेश

अभियंता भवनात झालेल्या या बैठकीदरम्यान अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) च्या महिला शहराध्यक्षा शोभना देशमुख, छाया कथलकर, संजय कथलकर, मनसेचे पश्चिम विदर्भ विद्यार्थी आघाडी प्रमुख भूषण फरतोडे, तसेच शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांचे पुतणे देव नेभनानी यांचा समावेश आहे. हे सर्व नेते आपल्या समर्थकांसह पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला.

 

संबंधित बातम्या

Back to top button