तर, मुंबई, पुणे, ठाणे जाम होणार?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा

* ओबीसी मोर्चात फडणवीसांवर टीका

नागपूर /10 ऑक्टोबर :  महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संविधान चौकात आज ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात बोलताना काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस सरकार 374 ओबीसी जातींच्या भरवशावर निवडून आले आहे; त्यामुळे ते आमचा डीएनए ओबीसी असल्याचा दावा करतात. सत्ता प्राप्त झाल्यानंतर ते ओबीसी समाजाला विसरले आहेत आणि मनोज जरांगे यासारख्या अशिक्षित व्यक्तीला नतमस्तक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचेही यावेळी म्हटले. ही टीका काँग्रेस नेते आणि सकल ओबीसी महामोर्चाच्या आयोजक विजय वडट्टेवार यांनी केली.मोर्चादरम्यान वडट्टेवार यांनी इशारा दिला की, राज्य सरकार जर आबेसी आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवत नाही, तर मुंबई, ठाणे आणि पुणे शहर जाम करण्याची त्यांची तयारी आहे. हा मोर्चा संविधान चौकात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला आणि राज्यभरातून हजारो आबेसी बांधव सहभागी झाले. मोर्चावर ‘२ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा’ आणि ‘आबेसी आरक्षणाचा हक्क – आबेसी आरक्षण बचाव’ असे फलक झळकावण्यात आले. आदळलेले संदेश ठाम होते की, मराठा समाजाला आबेसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे आणि तो आबेसी समाजाच्या हक्कावर आघात करतो. मोर्चाच्या तयारीत काग्रेस नेते विजय वडट्टेवार, समन्वय समिती सदस्य उमेश कारे आणि काग्रेस नेते रवींद्र दरके यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आजचा मोर्चा फक्त ट्रेलर आहे, अजून पुढे अधिक तीव्र आंदोलने होण्याची शक्यता आहे.

* सरकारने वेळीच शुद्धीवर यावे

विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “हा जिहाद ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसींच्या मानेवर सुरी चालविण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे,” असे वक्तव्य करत वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, विदर्भातील कृषी सहाय्यक आणि पोलीस भरतीमधील बहुतांश जागा मराठवाड्यातील मराठा समाजाने बोगस कुणबी प्रमाणपत्रे सादर करून मिळवल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक ओबीसी उमेदवार नोकरीपासून वंचित राहत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button