शेतकरी विरोधी इंडो-यूएस ट्रेड डील रद्द करा
अमरावतीत युवक काँग्रेसचे सातव्या दिवशीही आंदोलन

चिखलदरा/15एप्रिल: केंद्र शासनाने लागू केलेल्या कथित शेतकरी विरोधी इंडो-यूएस ट्रेड डीलच्या निषेधार्थ देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने साखळी पद्धतीने सुरू असलेला सत्याग्रह आज सातव्या दिवशीही तीव्रतेने सुरू राहिला. या आंदोलनाला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत असून, शेतकर्यांच्या हितासाठी हा लढा अधिक उग्र करण्याचा इशारा पदाधिकार्यांनी दिला. या सत्याग्रहात (माजी मंत्री), यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेस अध्यक्षा कंचनमालाताई गावंडे यांचीदेखील उपस्थिती लक्षणीय होती. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव निलेश गुहे, सागर कलाने, सहदेव बेलकर (तालुका अध्यक्ष, चिखलदरा), मेलघाट विधानसभा अध्यक्ष पियूष मालवीय, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशीष यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राहुल येवले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, ही ट्रेड डील शेतकर्यांच्या पाठीवर खंजीर खुपसणारी आहे. सरकारने शेतकर्यांच्या विरोधातील निर्णय घेणे तात्काळ थांबवावे. ही डील रद्द होईपर्यंत युवक काँग्रेसचा साखळी सत्याग्रह देशभर सुरूच राहील, असा इशारा दिला. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काळात हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.




