अहिल्यानगर दंगल सरकार पुरस्कृत

मुंबई – अहिल्यानगर येथील दंगल सरकार पुरस्कृत होती. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे या प्रकरणी वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर येथे सामेवारी आयलव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या पोशभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपर्युक्त आरोप केले आहेत. ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकरी रडत आहेत, लाखो लोकांचे घर गळीत आहेत, अन्नधान्य, कपडे, पीकपाणी आणि वाहने यांचेही नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button