अंधश्रद्धाविरोधी लढ्याला अधिक बळ देण्याचा निर्धार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाक्षिक सभा उत्साहात संपन्न

अमरावती /14 जून: अमरावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती जिल्हा आणि शहर शाखेची नुकतीच गुरुदेव सेवाश्रमात बैठक पार पडली.
या बैठकीत जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वयाचे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, अंधश्रद्धाविरोधी मोहिमेचा विस्तार करून ती गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी समितीने कंबर कसली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश तरारे होते. यावेळी समितीच्या आगामी कार्याची दिशा निश्चित करण्यात आली. यात नवीन शाखांची बांधणी, संघटनात्मक विस्तार, बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आणि लेखन-वाचन कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. समितीच्या या मोहिमेला आता अधिक व्यापक स्वरूप देऊन समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध संघटितपणे लढा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.कार्यकर्त्यांचा विशेष गौरवयावेळी अमरावती जिल्हा शाखेला मिळालेल्या ’लक्ष्यवेधी शाखा’ पुरस्काराबद्दल डॉ. सतीश तरारे यांचा, तर ’लक्ष्यवेधी कार्यकर्ता’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांचा राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांना प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.या बैठकीत राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, रामदास सदार, लक्ष्मण तडस, जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख, सचिन खोब्रागडे, मंजू वासणिक, अफसरभाई, महेश देशमुख, विजय दावडे, दिलीप लाडे आणि सौरभ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सचिन खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजू वासणिक यांनी केले. सभेच्या शेवटी अंनिसचे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button