भारताच्या डीएनएमध्येच नाविन्यता

फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

भारत आता फक्त ग्राहक नाही, तर योगदानकर्ता

नवी दिल्ली/14 जून – भारताच्या तरुणांची मानसिकता नवीन आहे, जी संपूर्ण मानवतेचा विचार करते. भारत शाश्वत भविष्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी नवनिर्मिती करत आहे. नाविन्यगता ही भारताच्या डीएनएमध्येच आहे. हजारो वर्षांपासून भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञानातील आपल्या योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. 14 जून) केले. फ्रान्समधील नीस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत ’भारत इनोव्ह्हेट्स’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हतणाले की, भारत जागतिक इनोव्हेशनमधील एक उगवती शक्ती आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक न राहता उपाय (सोल्यूशन्स) पुरवणारा देश बनत आहे. भारत एक जागतिक इनोव्हेशन सोल्यूशन्स हब म्हणून उदयास येत आहे. देश तरुण आणि तळागाळातील परिसंस्थेला पाठबळ देत नाविन्यतेची सांगड सर्वसमावेशकता आणि शाश्वततेशी घालत आहे.पंतप्रधान मोदींनी भारताच्या तरुणांचे कौतुक केले. तरुण केवळ संकुचित व्यावसायिक हितसंबंधांसाठी काम न करता मानवतेच्या कल्याणासाठी उपाय शोधत आहेत, असे ते म्हणाले. भारताच्या तरुणांची मानसिकता नवीन आहे, जी संपूर्ण मानवतेचा विचार करते, असे मोदी म्हणाले. भारताच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी ’शाश्वतता’ असून भारत जगासाठी नवनवीन शोध लावत आहे, यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भर दिला. भारत गतीने आणि मोठ्या प्रमाणावर (इनोव्हेशन करतो. भारत शाश्वत भविष्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी इनोव्हेशन करतो, असे ते म्हणाले.भारताच्या ऐतिहासिक वारशाचा हवाला देत मोदी म्हणाले की, इनोव्हेशन हे देशाच्या डीएनएमध्येच आहे. हजारो वर्षांपासून भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञानातील आपल्या योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button