शहरात 50 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

राजापेठ प्रभाग 22 चा होणार कायापालट

रवी राणा यांच्या प्रयत्नांना यश

अमरावती /4 ऑगस्ट- शहरात आ. रवी राणा यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक अठरा राजापेठ आणि प्रभाग क्रमांक 22 नवीन वस्तीमध्ये 50 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा आणि संत साई राजेश्वर मोरम यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, नगरसेवक अजय जयस्वाल, राजश्री डोंगरे, प्रभाग समिती सभापती किशोर यादव, गौरी मेघवाणी, प्रशांत वानखडे, महेश मूलचंदानी, नंदा सावळे आणि राजेश नानवानी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. विकास हीच आपली प्राथमिकता असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी सांगितले. राजापेठ आणि नवीन वस्तीमधील विकासकामामुळे परिसराचा कायापालट होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ओम डेमला, प्रेमचंद कुकरेजा, मनोज चांडवानी, पिंकी चांडवानी, रोशलाल हबजाणी, नानक मूलचंदानी, सुरेश खत्री, शैलेश मेश्रामकर, अमोल मिलके, मुस्तफाभाई, ज्योती बिसने, सुरेश चापळे, मनोज भगत, संगीता आगरकर, पूजा दुबे, वंदना पवार, अमित यादव, महेश पांचाळे, सुभानभाई, सचिन पवार, सुचिता पाटील, अंजली बिसने, शालिनी पारसकर, अरुण जाधव, भैरव साहेब, राजू मोंगडे, छकरे काका, एकनाथ बोरकर, मोहन मोरे, अशोक गायधवाड, साजन काका, वंजारीभाऊ, चौधरीभाऊ, रोहन वाघमोडे, लिलाबाई आगवणे, संगीताबाई आगरकर, अमोल टालो, भोंडेभाऊ, सागर आगरकर, देवंडेभाऊ, अजय पर्वते, श्रीकृष्ण आठाड, पंडित महेश शर्मा, पंडित दीपक शर्मा, रोशलाल बलवानी, राजा नानवानी, इंदलबल दीवानी, अनुप हवानी, विशाल अनिल अडवाणी, मुकेस खत्री, राजा शाही, दीपक हवानी, नानकराम मूलचंदानी, राजकुमार बोधवानी, शंकरलाल नानवानी, इंदलबल जंबवानी, प्यारोलाल बजाज, किशोर बत्रा, शंकर खत्री, राजेंद्र महोद्रे, सुनील इंदूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button