परिचारिकांचे दोन तास काम बंद, तीव्र घोषणाबाजी

अमरावतीमध्ये आरोग्य सेवा ठप्प, नर्सेस फेडरेशन आक्रमक, मागण्यांसाठी एल्गार

अमरावती /4 ऑगस्ट– महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अमरावती शाखेकडून आज जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन, जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत दोन तास काम बंद आंदोलन करण्यात आले. रुग्णालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
फेडरेशनने सुधारित सेवा प्रवेश नियम तत्काळ अंतिम करणे, सर्व प्रलंबित पदोन्नत्या पूर्ण करणे, रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करणे, सुधारित आकृतीबंधास मान्यता देणे आणि सर्व प्रलंबित विषयांवर वेळेत निर्णय घेणे या पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या आंदोलनात वर्षा पागोटे, विद्या चुडे, नलिनी पिंजरकर, पूनम खडसे, दुर्गा घोडीले, विद्या भुसारी, मेघा चौबे, नीतू श्रीखंडे, जयश्री मोरे, प्रफुल्लता खडसे, साधना ठाकूर, सपना वाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो परिचारिका सहभागी झाल्या होत्या. राज्यस्तरावर इंदुमती थोरात, कमल वायकोळे, विशाल सोनार यांनी नेतृत्व केले. शासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस पावले न उचलल्याने हे आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button