नक्षलवाद्यांसोबत शस्त्रसंधी अमान्य

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा पथकांनी देशातील नक्षल वाद 31 मार्च 2026 पर्यंत संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला यश मिळू लागले आहे. मागील काही महिन्यांत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जात आहेत अथवा शरण येत आहेत. अलिकडेच नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी काही जणांनी शरणागती पत्करली आहे. यामुळे नक्षलवाद्यांची स्थिती कमकुवत होत आहे. या पोर्शभूमीवर नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी प्रस्ताव सादर केला आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. जीवंत असलेले सर्व नक्षलवादी शरण आले तर त्यांना सरकारी अभय योजनेचा लाभ होईल. पण शरण आले नाही तर त्यांना मरावे लागेल.




