पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी युद्धाची गरजच नाही

राजनाथ सिंहांचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून मोठं वक्तव्य

*  मोरक्कोमधील भारतीय समुदायाला संबोधन

नवी दिल्ली/22 सप्टेंबर : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या मोरक्को दौऱ्यावर गेले आहेत. ही भेट त्यांच्या कारकीर्दीतील मोरक्कोमधील पहिली भेट आहे. या दौऱ्यादरम्यान सिंह मोरक्कोतील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार हा आफ्रिकेतील पहिला भारतीय संरक्षण उत्पादन कारखाना आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. सिंह यांनी मोरक्कोच्या राजधानी रबात येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हटले की, भारताप्रति तुमची भक्ती, स्नेह आणि प्रेम स्वाभाविक आहे; आपण जगभरात कुठेही असला तरी आपण भारतीय आहोत हे विसरू नये. भारतीय असल्यामुळे आपल्या जबाबदार्‍या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. आपण मेहनत करतो, काम करतो, उदरनिर्वाह करतो आणि आपली दखल घेतो, त्यामुळे मोरक्कोबरोबर कुठलाही वियेकासघात होऊ नये आणि भारताचे चरित्र जपले जावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबतही भाष्य करत म्हटले की, पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात समाविष्ट होईल आणि त्या भागातील लोकही लवकरच भारताचा भाग होतील. त्यांनी आपला अनुभव सांगत, पाच वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेले असताना तेथे भाषण करताना असे म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून ताबा मिळवण्याची गरज नाही, कारण तो भाग आपलाच आहे आणि लवकरच भारतात समाविष्ट होईल; एक दिवस पाकिस्तानी स्वतःच मान्य करतील की ते भारताचा भाग आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

 

संबंधित बातम्या

Back to top button