डॉ.मनीषा जेजुरकर हायप्रोफाईल खटला सत्र न्यायालयात
प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा

नाशिक/27 नोव्हेंबर : नाशिकमधील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील जप्त केलेला सर्व मुद्देमाल 1 डिसेंबरपूर्वी सत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश गंगापूर पोलिसांना देण्यात आले आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 आणि सहकलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





