कन्हाळगाव अभयारण्य रद्द करा
सुधीर मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर/15 नोव्हेंबर : जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य रद्द करावे, अशी मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एक दिले आहे. मुनगंटीवार यांनी मुंबईत बसलेल्या तथाकथित पर्यावरणवाद्यांवर सडकून टीका केली.
31 हजार हेक्टर वनक्षेत्रावर असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याची तत्कालीन मुख्यमंत्री आणि वनमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये घोषणा केली होती. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे 2014 ते 2019 पर्यंत वनमंत्री असताना त्यांनी स्थानिकांच्या विरोधामुळे या अभयारण्याला मान्यता दिली नव्हती.कन्हाळगाव अभयारण्य हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि कावल व्याघ्र प्रकल्प या मधील महत्त्वाचा टायगर कॉरिडोर असून या भागात अतिशय समृद्ध जैवविविधता आहे. टायगर कॉरिडोर असण्यासोबतच या भागात किमान 22 ते 32 वाघ सध्या वास्तव्याला देखील आहेत. मात्र या जंगलावर निर्भर असलेल्या स्थानिकांच्या रोजगार आणि इतर हक्कांवर गदा येईल, असा मुनगंटीवार यांचा दावा आहे.





