परदेशात डॉक्टर बनून भारतात प्रॅक्टिस
FMGE परीक्षेचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड; 5 जणांना अटक

वर्धा/10 नोव्हेंबर : भारतात वैद्यकीय म्हणजे चइइड अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा म्हणुन नीट परीक्षेची देशभरात लाखो विद्यार्थी तयारी करतात. त्यात यश मिळाले नाही तर भारतात ही पदवी घेणे शक्यच होत नाही. कारण ही किमान पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. ती पास होऊनही गुण नसल्यास प्रवेश शक्य होत नाही. मग करायचे काय, असा प्रश्न पाल्यास डॉक्टर करायचे असे स्वप्नं पाहणार्या पालकांना पडतो.
त्यातूनच विदेशात डॉक्टर होण्याचा मार्ग अनेक देशात उपलब्ध आहे. हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी रशिया व अन्य देशात आहेत. पण एक मेख आहेच. या सर्व विदेशातून डॉक्टर पदवी घेऊन येणार्या विद्यार्थ्यांना भारतात एक परीक्षा देणे आवश्यक आहे. ती उत्तीर्ण व्हावीच लागते. मात्र ही परीक्षा अत्यंत अवघड समजल्या जाते. यावरच हा बेकायदेशीर उपाय व झालेली कारवाईचा प्रकार. महाराष्ट्र सायबर पोलीस शाखेने परदेशी वैद्यकीय पदवीधर विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली परीक्षा उत्तीर्ण नं करता वैद्यकीय नोंदणी मिळवून देणार्या आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यात 2 आरोपीना अटक झाली. आता या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीची संख्या 5 वर पोहचली आहे. खाते प्रमुख डीआयजी अजय बन्सल यांनी माध्यमांना सांगितले की तांत्रिक तपास व डिजिटल पुरावा या आधारे ही फसवणूक उजेडात आली आहे. अटक करण्यात आलेल्यात एक आरोपी शिवम राकेश हा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा असून तो तिथे स्वतःचे रुग्णालय चालवितो. त्याच्याकडे चइ- ची पदवी आहे. तोच या फसवणूकीचा मास्टर माईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने 30 पेक्षा अधिक लोकांना बनावट प्रमाणपत्रे दिली आहे. दुसरा आरोपी धर्मेंद्र लक्ष्मण सिंग हा भोपाळचा रहिवासी आहे.





