1930 मध्ये संघावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न झाला होता

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य

नागपूर/9 नोव्हेंबर: संघाचे कार्य केवळ एका चौकटीपुरते मर्यादित नसून व्यक्तींच्या संपर्कातून आणि विश्वासातून समाजाशी जोडले गेले आहे. संघाचे कार्य कुणाच्या कृपेने नाही तर स्वकर्तृत्वाने सुरू आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील नूतन मुख्यालय आणि सभागृहाचे उद्घाटन तसेच संघाचे प्रचारक श्याम हरकरे लिखित विदर्भातील संघकार्याचे सप्तर्षी या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी, 9 नोव्हेंबर रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या प्रवासातील एका चर्चेत नसलेल्या घटनेचा उल्लेख नागपुरात केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर अवघ्या काही वर्षांत, सेंट्रल प्रोव्हिन्स असताना 1930 मध्ये संघावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी इब्राहिम नामक एक मुस्लीम व्यक्ती पुढे आली होती व संघ सांप्रदायिक नसल्याचे सांगत संघबंदीला विरोध केला होता. डॉ. हेडगेवार हे चांगले व्यक्ती असून संघ सांप्रदायिक असू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. संघाचे कार्य केवळ एका चौकटीपुरते मर्यादित नसून व्यक्तींच्या संपर्कातून आणि विश्वासातून समाजाशी जोडले गेले आहे. संघाचे कार्य कुणाच्या कृपेने नाही तर स्वकर्तृत्वाने सुरू आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील नूतन मुख्यालय आणि सभागृहाचे उद्घाटन तसेच संघाचे प्रचारक श्याम हरकरे लिखित विदर्भातील संघकार्याचे सप्तर्षी या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी, 9 नोव्हेंबर रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, श्याम हरकरे, बँकेचे अध्यक्ष आ. संजय भेंडे आणि उपाध्यक्ष अशोक अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले की, संघ कुणाच्या कृपेमुळे नव्हे तर स्वयंसेवकांच्या स्वकर्तृत्वातून उभा आहे. माणसाला चांगले बनविले तर सर्व काही चांगले होईल, या विचारातून संघाचे काम सुरू आहे. संघाचे प्रचारक स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून संपूर्ण आयुष्य संघकार्याला समर्पित करतात. त्यांना प्रसिद्धी, कृतज्ञता किंवा मोबदल्याची अपेक्षा नसते.

Back to top button