त्रिमूर्तीचे 11 किलो चांदीचे नाणे चर्चेत

धनत्रयोदशीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित सोनी यांनी दिली माहिती

अमरावती/6 नोव्हेंबर – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अमरावतीच्या सराफा बाजारात त्रिमूर्ती ज्वेलर्सने तयार केलेले 11 किलो वजनाचे शुद्ध चांदीचे नाणे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यापूर्वी 5 किलो वजनाचे खास चांदीचे नाणे तयार करणार्‍या त्रिमूर्तीने यंदा त्यापेक्षा मोठे नाणे साकारले असून, त्याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांदीचे दर कमी झाल्याने हे नाणे तयार करण्यात आले असून, त्याच्या आकर्षक बनावटीमुळे खरेदीदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्रिमूर्ती ज्वेलर्स आणि त्रिमूर्ती प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चांदीची नाणी आणि मूर्ती तयार केल्या जातात.
संचालक अमित गिरीधर सोनी यांनी सांगितले की, अमरावतीकरांनी नेहमीच चांदीच्या नाण्यांना चांगली पसंती दिली आहे. यापूर्वी 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या नाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर 5 किलो वजनाचे खास नाणे तयार करण्यात आले होते. त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा चांदीचे दर कमी झाल्याने 11 किलो वजनाचे नाणे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नाण्याची आकर्षक घडण आणि मोठे वजन यामुळे ते पाहण्यासाठीही ग्राहक उत्सुक आहेत. त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये हिर्‍यांचे दागिने तसेच विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. त्रिमूर्ती प्रॉडक्ट्समध्ये शुद्ध चांदीची भांडी, नाणी आणि मूर्तींची विक्री केली जाते. काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायालाही अमरावतीसह आसपासच्या शहरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सराफा बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ वाढली होती. सोने, चांदी, हलक्या वजनाचे दागिने आणि चांदीच्या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. शहरातील सराफा बाजारासह बडनेरा मार्गावरील दालनांमध्येही दिवसभर खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. यंदाच्या सणासुदीच्या खरेदीत त्रिमूर्तीच्या 11 किलोच्या चांदीच्या नाण्याने विशेष आकर्षण निर्माण केले आहे.

Back to top button