सुधारित पीक विमा योजने संदर्भात सर्वंकष चर्चा व्हावी
आ. संजय खोडके यांची विधनपरिषदेत मागणी

*एकच ट्रिगर सुरु, पेच निर्माण होण्याची शक्यता
मुंबई / 1 जुलै: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानपरिषदेतील कामकाजा दरम्यान प्रशोत्तराच्या तासांमध्ये सुधारित पीक विमा योजने संदर्भात चर्चा करतांना आ. संजय खोडके यांनी काही मुद्दे उपस्थित केले. पीक विमा योजनेचे पूर्वीचे चार ट्रिगर बंद करून एकच ट्रिगर सुरु असल्याने पुढील काळात नवा पे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात लोक प्रतिनिधीच्या मार्फत एक समिती व सर्वंकष चर्चा करण्यासाठी बैठक बालवावी, अशी सुचना संजय खोडके यांनी सभागृहाला केली. खोडके यांच्या प्रश्नावर उत्तर देतांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक कापणी प्रक्रिया आधारित पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केली असल्याने या सभासदांना याबाबत शंका व संशय असेल त्या दृष्टीने सुधारणाकरण्यासंदर्भात बैठक घेण्याचे मान्य केले आहे. राज्य विधिमंडळाच्यावरिष्ठ सभागृहात प्रश्न क्रमांक – 2 वर चर्चा करतांना आ. संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केले की, शासनाने हि सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. म्हणजेच नवीन पीक कापणी प्रयोग आधारित पीक पिमा योजना यातून पूर्वीचे तीन ट्रिगर बंद केले आहे. पीक विमा योजनेत जे चार ट्रिगर होते ज्यामध्ये पेरणी नंतर पाऊस न पडल्यास शेतकर्यांना अग्रीम मिळत होती. नैसर्गिक आपत्ती जसे कि अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, गारपीट, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना भरपाई मिळत होती. अनियमित हवामान, तापमान किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जात होती. पिकाची कापणी केल्यानंतर ती शेतातच भरून ठेवलेली असताना अतिवृष्टीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळत होती. असे चार ट्रिगर होते. परंतु नवीन पीक विमा योजनेत वरील तीन ट्रिगर बंद करण्यात आले. शेवटचा चौथा काढणी पश्चात नुकसान भरपाई या आधारावरच पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. कुठल्याही योजनेमध्ये जर 25 टक्के पाऊस राहिला किंवा नापेर राहिला तर पीक विमा मंजूर होते.




