खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू

एका मुलीला वाचवण्यात यश

रत्नागिरी/11ऑक्टोबर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. खाडीत कालवे काढण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेली पाच मुले खोल पाण्यात बुडाली. नाणार इंगळवाडी येथील जुनेद भाटकर यांची पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह खाडीमध्ये मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी खाडीतील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील पाच भावंडे खाडीच्या खोल पात्रात बुडाली.
चार मुलं बुडाली, लहान मुलीला वाचविण्यात यश
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुली आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद जुनेद भाटकर, जुहेरिया भाटकर, बुशिरा भाटकर, माहिरा भाटक अशी मृतांची नावे आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, 15 वर्षीय माहिरा भाटकर या मुलीचा शोध सुरू आहे. खाडीत बुडणार्‍या पाच मुलांपैकी एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे.

Back to top button