लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा धीरज देशमुखांचंच वर्चस्व

सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपदी निवड

 लातूर /26 नोव्हेंबर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते आणि अभिनेता रितेश देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांची पुन्हा निवड झाली आहे. सलग दुसर्‍यांदा त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे लातूर जिल्हा बँकेवरील धीरज देशमुख यांचे नेतृत्व पुन्हा एकदा कायम राहिले आहे.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने दमदार कामगिरी केली होती. बँकेच्या एकूण 19 संचालकपदांपैकी सहकार पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे संचालक मंडळात सहकार पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही धीरज देशमुख यांचे पारडे जड मानले जात होते.

Back to top button