अभिजीत दीपके, सौरभ दास यांच्या अडचणी वाढणार?

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने बजावली नोटीस

मुंबई /26 नोव्हेंबर : कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांना नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक निदर्शने आणि आंदोलनांसाठी नियम तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणार्‍या वकील संघटनेने देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला आता सीजेपी नेत्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका विचारात घेण्यास सहमती दर्शवली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने केंद्र सरकार, उगझ नेते अभिजित दीपक, सौरव दास, आशुतोष रांका आणि इतरांना नोटीस बजावून त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे वकील संघटनेच्या वतीने हजर होते. ’लॉयर्स व्हॉइस’ या वकील संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत, सार्वजनिक आंदोलनांचे आयोजक आणि सहभागी यांच्या जबाबदार्‍या निश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक, एकसमान आणि प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. मतभेद व्यक्त करणे हा लोकशाहीचा भाग आहे, पण आंदोलने कायदेशीर चौकटीत असावीत आणि त्यामुळे राजधानीतील सार्वजनिक जीवनात व्यत्यय येऊ नये. शिवाय, वकिलांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, असे या याचिकेत म्हटले आहे.

Back to top button