जिल्ह्यात 25 हजार वृक्षारोपणाचा भव्य संकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस अन् स्व.अजीत पवारांच्या स्मृतीस आदरांजली

माजी खा.नवनीत राणा, आ.रवि राणा, भाजप शहराध्यक्ष डॉ.नितीन धांडे, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची प्रमुख उपस्थिती
अमरावती/22 जुलै -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन म्हणून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तब्बल 25 हजारांपेक्षा अधिक झाडे लावण्याचा अभूतपूर्व आणि भव्य संकल्प भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या पवित्र आणि भव्य वृक्षारोपण मोहिमेचा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अमरावती येथील हनुमान गढीवरील रामवाटिका परिसरात विविध झाडे लावून दिमाखात शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे मायेने जतन केले पाहिजे, असे भावूक आवाहन नवनीत राणा यांनी यावेळी केले. हे केवळ एक औपचारिक अभियान नसून निसर्ग संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ आहे. पुढील दहा दिवस संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात, शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी व निमसरकारी कार्यालयांच्या परिसरात हे अभियान राबवले जाणार आहे. तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाची आणि आठवणींची साक्ष म्हणून किमान एक रोप लावून ते जगवावे, अशी हाक त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार रवी राणा, भाजप शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते, मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, अर्जुना सर, उपवनसंरक्षक सुमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार, कमलताई गवई, साई राजेशजी मोरडिया, साई गौतमलाल महाराज, विनोद कलंत्री, दर्शना पाटील, महेंद्र इंगळे, ओम शांतीच्या सीता दिदी, कीर्ती जमदाडे, डॉ. बेलसरे, डॉ. डगवार, डॉ. प्रफुल्ल कडू, शेखर भोयर, सुनील खराटे, संजय तीर्थकर, कल्याणी तायडे, ऋषिकेश देशमुख, सुनील वर्हाडे, प्रकाश साबळे, सोनाली नवले, कमलेश पाटील, प्रथमेश आडपे, ज्ञानेश्वर देसाई, डॉ. मयुर भयुलुमे, सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, नाना आमले, प्रीती रेवणे, प्रशांत वानखडे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, किशोर जाधव, प्रियंका पाटणे, अर्चना पांडे, योगेश विजयाकर, महेश मुलचंदानी, नंदा सावदे, संजय हिंगासपुरे, दीपक साहू, उमेश ढोणे, संदीप कांबळे, अशोक पांडे, आशिष कावरे, अजय घुले, विनोद जायस्वाल, प्रा. संतोष बनसोड, अनुप अग्रवाल, मोलकेताई, प्रेमा लव्हाळे, नितीन बोरेकर, उदय पर्वतकर, शैलेश मेघवानी, सुरेश चाफले, संतोष साहू, पंकज गायकवाड, सुनीता राऊत, विवेक चुटके, दीपक खताडे, हरिभाऊ नाडे, नीता खडसे, पूजा दुबे, संगीता बरम्मैया, पिंकी चांदवाणी, अविनाश काळे, सुरज बटुले, विजय दुधे, अर्जुन दाते, करण देठवाल, विजय खंडेलवाल, भूषण पाटणे, कुणाल गुप्ता, सुखदेव तरडेजा, यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




