दोन युवकांचा मृत्यू
चिखलदरा फिरण्यासाठी निघालेल्या

मार्गावर मालवाहू गाडीची जोरदार धडक
घटांग फाट्याजवळ दोनचाकी वाहनाचा भीषण अपघात
चिखलदरा /19 जुलै – परतवाडा मार्गे निसर्गरम्य वातावरण असलेल्या चिखलदरा परिसरात आपल्या दुचाकीने फिरण्यासाठी जात असलेल्या दोन निष्पाप तरुण मित्रांच्या गाडीला एका भरधाव येणार्या मालवाहू वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या
अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणार्या धडकेत दोन्ही युवकांचा जागीच अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास धारणी ते परतवाडा मुख्य मार्गावरील घटांग गावच्या वाई फाट्याजवळ घडली आहे. सुटीच्या दिवशी घडलेल्या या भयानक अपघातामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, परतवाडा येथील कांडली भागातील रहिवासी असलेला यश रवि कोठेकर (वय 24) आणि दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर येथील रहिवासी असलेला त्याचा जिवलग मित्र मंथन सुरेश वानखडे (वय 27) हे दोघे तरुण मित्र आपल्या पल्सर दोनचाकी गाडीने (क्रमांक एमएच 27 ईई 6896) चिखलदर्याच्या निसर्गरम्य आणि थंड हवेच्या वातावरणात विकेंडची सुटी साजरी करण्यासाठी आनंदाने निघाले होते. मात्र, काळाला काही वेगळेच मंजूर होते. धारणीकडून परतवाडा शहराच्या दिशेने अतिशय वेगाने येणार्या एका अनियंत्रित मालवाहू पिकअप गाडीने (क्रमांक एमएच 27 डीटी 8282) त्यांच्या दोनचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण आणि आक्रमक होता की, दोन्ही
तरुण गाडीवरून कित्येक फूट दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळावरच करुण मृत्यू झाला. या अपघातातील मालवाहू गाडी यवतमाळ जिल्ह्यातील नेर परिसरातील रहिवासी असलेला चालक निखील दिपक गुधाने (वय 33, रा. पिंपळगाव पाने) हा चालवत होता. या भीषण अपघातानंतर रस्त्यावरील व परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हसत्या-खेळत्या दोन तरुण मुलाख8ए अशा अचानक जाण्याने कांडली व शिंगणापूर परिसरासह मृत युवकांच्या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे




