दिल्लीत आंदोलन भडकले लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
चकमकींमध्ये 50 पोलीस कर्मचारी जखमी,अनेक विद्यार्थी बेशुद्ध

कॅनॉट प्लेससह अनेक ठिकाणी तोडफोड, पोलिसांवरही दगडफेक
संसद मोर्चादरम्यान हिंसक वळण सीजेपी नेत्यांची नड्डांसोबत चर्चा
नवी दिल्ली/20 जुलै-संसदेकडे निघालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केल्यानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपके यांनीही शांततेच्या मार्गानं पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेनंतर दुःख व्यक्त करतानाच, त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकृती खालावलेली असताना, पुन्हा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेणार्या सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात असल्याची भीतीही दीपकेंनी व्यक्त केली. वांगचुक यांना काही झालं तर, त्याला हे सरकार आणि दिल्ली पोलीस जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्ली पोलिसांनी आज जे काही केलंय आहे, विद्यार्थ्यांना मारलंय, त्यांची डोकी फोडलीत, ते खूपच लज्जास्पद आहे. यामुळे जगभरात आपल्या देशाची बदनामी होत आहे. दिल्ली पोलिसांनी असं का केलं हे सगळ्यांना माहीत आहे. वरून आदेश आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून आदेश आले होते. दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलंय. यामुळे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे




