आषाढी यात्रेसाठी 5 हजार 500 विशेष बसेस सोडणार

ग्रुप बुकींग असल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस पोहण्याचा मोह जीवावर बेतला

पंढरपूर /12 जुलै: आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन
महामंडळाकडून यात्राकाळात 5 हजार 500 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी
महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.यावेळी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक म्हणाले, राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ’अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ’महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button