राज्यातील 145 रेल्वे फाटकावर उड्डाणपूल

महाराष्ट्राला फाटक मुक्त करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

484 कोटींच्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण

नागपूर /12 जुलै : राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रोड, ओवर ब्रिज तसेच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड महारेल यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते, तर यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी
समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे
नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.रेल्वे फाटका अभावी दरवर्षी 21 हजार लोकांचा मृत्यू
होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 524 रेल्वे फाटकांची आवश्यकता असून त्यापैकी 10 हजार पेक्षा जास्त दळणवळणातंर्गत असलेल्या 121 फाटकासोबतच इतरही 145 रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली असून हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षात महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामसाठी महारेलची स्थापना केल्यामूळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे. नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्व काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेल्वेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून यासाठी पेटेंटसुध्दा मिळविले आहे. कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

संबंधित बातम्या

Back to top button