स्वाभिमानासाठी राज्यसभेची संधीही नाकारली

नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

* उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

अमरावती/12 जुलै: मी माजी खासदार झाले याच्या वेदना आहेतच, पण मी शांत नाही. शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं, अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांना उत्तर दिलं. मी विचारांची पक्की असल्यानेच राज्यसभेसाठी दुसर्‍याच्या दारात गेले नाही, असंही त्या म्हणाल्या. नवनीत राणा या अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. काँग्रेसने केलेल्या टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, मी कधी शासकीय कार्यक्रमात मंचावर जात नसते. मी माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना होतात. पण त्यावर मी कधीही जास्त भाष्य करत नाही. विरोधकांना मी
शुभेच्छा दिल्या आहे. परंतु, त्यांना शुभेच्छा दिल्या याचा अर्थ असा नाही की मी शांत बसले आहे. शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी छोडती नहीं हे लक्षात ठेवा.महिलांच्या बद्दल वक्तव्य करताना विरोधकांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, मी माझी मर्यादा कधीही विसरले नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार
टीका केली. राज्यसभेच्या खासदारकीवर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, लोक नगरसेवकपदासाठी एवढं लोटांगण
घालतात. नवनीत राणाचा स्वाभिमान इतका अटळ आहे की तिने राज्यसभेची संधी सोडून स्वाभिमान जपला. राज्यसभेला कधी दुसर्‍यांच्या दारी गेले नाही, त्याला ठोकर मारली. त्यामुळे मी माझ्या विचारांची पक्की आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
आमदार रवी राणांच्या नेहमीच पाठीशी असतात. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक गावचा विकास ते करतील, असा विेशास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर त्यांना रामाची आणि हनुमान चालीसाची आठवण आल्याची टीका नवनीत राणा यांनी केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं. आयुष्यातील 14 दिवस मी
केव्हाच विसरणार नाही. 40 डिग्रीमध्ये मी जेलमध्ये होते. ते मी कधीच विसरणार नाही. आमची लढाई होती, ती आम्ही लढलो. पण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना हनुमान चालीसा नको होती. जसे ते पदावरून खाली उतरले, पूर्ण पक्ष त्यांनी बरबाद करून टाकला, तेव्हा जाऊन हनुमानाचं नाव आणि हनुमान चालीसा वाचन त्यांनी केलं. मुख्यमंत्री असताना तेव्हाच हनुमान चालीसा वाचली असती तर ना आमदार फुटले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बरबाद झाला असता. सर्व बरबाद झाल्यावर उद्धव ठाकरे यांना राम आठवला, अजून बरंच काही आठवायचं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button