हर्षजीत देशमुखांना उमेदवारी देण्याची शक्यता
प्रवीण पोटेंना शह देण्यासाठी काँग्रेस सज्ज

अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मतांची जुळवाजुळव होण्याचा विश्वास
अमरावती/28 मे- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेने आता जोर धरला आहे. दरम्यान नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यांनी स्थानिक मतदारांशी संपर्क साधत प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला आहे. नागपूरवरून खास मिठाई आणून त्यांनी मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न चालवला असल्याने, काँग्रेसकडून त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत ते आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अमरावती मतदारसंघात सध्या विधान परिष देच्या निवड णुकीमुळे राज कीय वाता वरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षा कडून कोणाला संधी मिळ णार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, हर्षजीत देशमुख यांच्या सक्रिय तेने चित्र बर्याच अंशी स्पष्ट होत चालले आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांशी संवाद साधत प्रचाराचा नारळ फोडल्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. काँग्रेस पक्षातर्फे आतापर्यंत इतर कोणत्याही नेत्याने किंवा पदाधिकार्याने उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी काँग्रेसच्या गोटातून आता केवळ औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. एक जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने, त्यापूर्वीच ते शक्तीप्रदर्शन करून आपला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची वाढती ताकद आणि गणित अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये एकूण 453 मते असून, त्यापैकी काँग्रेसकडे 120 मते आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे 22, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे 11 मते आहेत. या आकड्यांची बेरीज केल्यास महाविकासआघाडीच्या पारड्यात 153 मते पडू शकतात. त्याव्यतिरिक्त एमआयएमची 16 मते असून, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून 34 मते आहेत. जर भाजप व महायुतीच्या विरोधात ही मते खेचण्यात महाविकास आघाडीला यश आले, तर काँग्रेसच्या उमेदवाराची मते 202 पर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे यनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा मुकाबला होण्याची चिन्हे दिसत असून, हर्षजीत देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसचे पारडे अधिक जड मानले जात आहे.





