मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नेमकी काय झाली चर्चा?

नवी दिल्ली/28 मे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी बुधवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी मांडल्या होत्या.
आमचे नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार! असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस दिल्ली दौर्‍यावर असून, काल त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्जाचे पुनर्गठन, व्याजात सवलत, शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभारआदी शेतकर्‍यांच्या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी शहा यांच्यासोबत चर्चा केली होती. या मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

संबंधित बातम्या

Back to top button