राणा दाम्पत्य आज अमरावतीत येणार

परदेश दौर्‍याच्या चर्चांना पूर्णविराम, राणा दाम्पत्य भारतातच

युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांशी आ.रवि राणांचा सातत्याने संपर्क

अमरावती/28 मे- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधुम सुरु असतांना आ. रवी राणा व माजी खा. नवनित राणा शहराबाहेर असल्याचे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. राणा दाम्पत्य परदेश दौर्‍यावर गेले असल्याचे बोलले जात होते, मात्र आता खुद्द त्यांच्या जवळच्या गोटातून समोर आलेल्या माहितीनुसार, राणा दाम्पत्य परदेशात गेलेले नसून ते भारतातच असल्याची खात्रीशीर वृत्त आहे. खा. नवनीत राणा सध्या मुंबईत तर आ. रवी राणा काही कामानिमित्त चंदीगडला गेले आहेत. चंदीगडमधील कामे उरकून आ. रवी राणा आज 29च्या सायंकाळपर्यंत अमरावतीत परतण्याची दाट शक्यता आहे. राजकीय वर्तुळात रंगलेल्या अफवांना ताज्या माहितीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक नगरसेवकांच्या माध्यमातून होत असतांना जिल्ह्यात युवा स्वाभिमानचे नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतील याचा निर्णय आ. रवी राणा घेणार आहेत. या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सर्वपक्षिय नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. त्यामूळे युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांना विविध प्रलोभने देण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या नाजुकप्रसंगी पक्षनेते शहरात नसणे यावर सर्वांना आश्चर्य वाटत होते मात्र युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांशी रवी राणा सातत्याने संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते.

रवी राणांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपतर्फे प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवी राणांची या संदर्भात कोणतीही प्रतिक्रीया अद्याप उपलब्ध झालेली नाही. प्रवीण पोटे यांच्या ऐवजी भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी द्यावी अशी जाहीर मागणी माजी खा. नवनित राणा यांना केली होती त्यामूळे उमेदवार प्रवीण पोटे यांच्याबाबत राणा कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button