नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड प्राध्यापक अटकेत

कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सांगितले, नीट परीक्षा पॅनेलमध्येही

नवी दिल्ली/15 मे- पेपर लीक प्रकरणात शुक्रवारी 8 वी अटक झाली. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे सांगितली होती.
सीबीआय कुलकर्णी यांनाच लीक प्रकरणाचा सूत्रधार (मास्टरमाइंड) सांगत आहे. तपास यंत्रणेनुसार, कुलकर्णी लातूरचे रहिवासी आहेत. ते रसायनशास्त्राचे डोमेन एक्सपर्ट आहेत. अनेक वर्षांपासून ते छएएढ पेपर तयार करणार्‍या पॅनेलचा भागही होते.कुलकर्णी यांना पेपरपर्यंत थेट पोहोच होती. ते पुण्यात त्यांच्या घरी कोचिंग क्लास चालवत होते. जिथे ते छएएढ पेपरमध्ये येणार्‍या प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना आधीच सांगत होते. 3 मे च्या पेपरपूर्वी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीने अनेक विद्यार्थ्यांना लीक झालेला पेपर दिला.दरम्यान, पेपरफुटीमुळे दुःखी झालेल्या दिल्लीतील 20 वर्षीय तरुणीने, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील 21 वर्षीय तरुणाने आणि गोव्यातील 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
टेलीग्राम ग्रुपवर लीक झालेला पेपर शेअर झाला होता-सीबीआयच्या तपासात हे देखील समोर आले आहे की, छएएढ 2026 चा पेपर 1 मे रोजीच लीक झाला होता. तो ’प्रायव्हेट माफिया’ नावाच्या टेलीग्राम ग्रुपवर टाकला गेला होता. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मात्र, दिव्य मराठी असा दावा करत नाही की ग्रुपमध्ये टाकलेला पेपर छएएढ चा लीक झालेला पेपरच आहे. टेलीग्राम ग्रुपवर 1 मे रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता टाकलेल्या पेपरची झऊऋ फाईल उघडल्यावर 12 नंबरचा सेट दिसतो. याची पडताळणी करण्यासाठी आम्ही छएएढ चा सेट नंबर-12 चा पेपर काढला. छएएढ च्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये एका चेंडूच्या उभ्या दिशेने वर जाण्याबद्दल आणि परत येण्याबद्दल वेग आणि वेळ दर्शवण्यासाठी आकृती तयार करण्यात आली आहे. हा प्रश्न लीक झालेल्या पेपरमध्ये आणि मूळ पेपरमध्ये 100% जुळत आहे. या पानातील इतर प्रश्न देखील पूर्णपणे जुळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button