शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटला

चोबीता येथील 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

चिखलदरा/13 मे: चिखलदरा तालुक्यातील चोबीता गावात शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टर पलटून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
मिळालेल्या माहितीनुसार विकास मुंगिलाल कास्देकर (वय 19) हा तरुण स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत होता गुरुवारी सकाळी सुमारे 10.30 वाजताच्या दरम्यान अचानक ट्रॅक्टरचा तोल जाऊन ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाला या भीषण अपघातात विकास ट्रॅक्टरखाली दबला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.अल्पवयातच कुटुंबातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कास्देकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चोबीता गावात शोककळा पसरली आहे पोस्टमाटर्म करुन मृतदेह नातेवाईकांच्या हवाले करण्यात आला व काटकुंभ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button