राज्यात रुग्णवाहिका सेवांसाठी स्वतंत्र नियमावली

हवाई रुग्णवाहिका आणि नव्या सेवांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश

अमरावती/24 नोव्हेंबर  – राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी आणि व्यवस्थित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हवाई रुग्णवाहिका आणि नव्या रुग्णवाहिका सेवांच्या संचालनासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, यासाठी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पुढील 2 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीच्या शिफारशींनुसार राज्य सरकार आवश्यक नियम आणि मार्गदर्शक सूचना लागू करणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्री प्रताप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक श्रीपाद अपराजित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती या संस्थेला देण्यात आला होता. यंदा विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवनची निवड एकमताने करण्यात आली आहे. याबाबत श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी सहसचिव सोपान गोडबोले, रवींद्र देशपांडे, उदय पर्वतकर, दीपक जोशी उपस्थित होते. स्व. डॉ. रमेश गोडबोले यांच्या रुग्णसेवेचा आदर्श नव्या पिढीसमोर राहावा, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे. समाजातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देणार्‍या संस्थांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून राबविला जात आहे. यंदा तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा समितीची निवड करण्यात आली असून, 28 नोव्हेंबर रोजी होणार्‍या सोहळ्यात संस्थेचा सन्मान केला जाणार आहे.

Back to top button