बच्चू कडूंसह 10 आमदारांचा शपथविधी

समापती राम शिंदे यांनी दिली शपथ

मुंबई /14 मे विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांचा शपथविधी समारंभ 11 वाजता पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याचे आयोजन विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते. नवनिर्वाचित आमदारांना विधानपरिषदेचे समापती राम शिंदे यांनी शपथ दिली. या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले होते.
या कार्यक्रमाला राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. शपथ घेणार्‍या सदस्यांमध्ये डॉ. निलम गोर्‍हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिन कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश होता. शपथविधीनंतर सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सलग पाचव्यांदा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बच्चू कडू यांच्या शपथविधी नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

संबंधित बातम्या

Back to top button