अमरावती शहर स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापनावर भर
आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून तपासणी

अमरावती /4 फेब्रुवारी : महानगरपालिकेच्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी सुकळी कंपोस्ट डेपो येथे भेट देऊन कचरा प्रक्रिया व्यवस्थापन प्रणालीची सखोल पाहणी केली. सदर पाहणी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2025 तसेच ॠऋउ अंतर्गत प्रक्रिया केंद्राच्या प्रत्यक्ष तपासणीच्या अनुषंगाने करण्यात आली. या पाहणीदरम्यान शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, कचरा संकलनाची कार्यपद्धती, कचरा वाहतूक व्यवस्था, कचर्यावर करण्यात येणारी प्रक्रिया तसेच सॅनिटरी लँडफिल फॅसिलिटी (डङऋ) व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. कचरा वाहतूक करणार्या वाहनांची तांत्रिक स्थिती, स्वच्छता, नियमित देखभाल, वाहनांवरील ॠझड प्रणाली, तसेच वाहन नोंदवही व दैनंदिन रेकॉर्ड यांची सखोल तपासणी करण्यात आली.
तसेच कंपोस्ट डेपोमध्ये कचर्याचे वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत, कंपोस्ट निर्मिती प्रक्रिया, पर्यावरणपूरक उपाययोजना, तसेच प्रक्रिया केंद्रातील स्वच्छता व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपायांची पाहणी करण्यात आली. कचरा प्रक्रियेशी संबंधित सर्व नोंदवही, मासिक अहवाल, वजन नोंदी व इतर प्रशासकीय रेकॉर्ड तपासून त्यांची अद्ययावतता व अचूकतेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार कंपोस्ट डेपोतील जुन्या मशिनरीच्या देखभाल व दुरुस्ती (मेंटेनन्स) कामांची तसेच प्रस्तावित नवीन मशिनरीच्या इंस्टॉलेशनबाबत सविस्तर पाहणी करण्यात आली. जुन्या मशिनरीचे कार्यक्षम मेंटेनन्स करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे तसेच नवीन अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया अधिक सक्षम, जलद व परिणामकारक करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पाहणीदरम्यान आढळून आलेल्या बाबींवर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी संबंधित स्वास्थ निरीक्षक, पर्यवेक्षक तसेच कंत्राटदारांशी सविस्तर चर्चा केली. आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या निर्देशानुसार कचरा प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराला अधिकाधिक गुण मिळावेत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करण्याचे आदेश देण्यात आले.




