महानगरपालिकेत सत्ता स्थापनेची अखेर राजकीय कोंडी फुटली

‘त्रिशुळ’ पॅटर्नवर सर्वानुमते झाले शिक्कामोर्तब

* आ.खोडके व आ.राणा यांच्यात दिलजमाई

अमरावती / 4 फेब्रुवारी महानगर पालिकेच्या निवडणूक निकालानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी अखेर फुटली असून, ‘अमरावती मंडल’ या दैनिकाने वर्तवलेला तर्क तंतोतंत खरा ठरला आहे. महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीत आता भाजपच्या नेतृत्वाखाली ‘त्रि-इंजिन’ सरकार स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.
25 सदस्यांचे बळ असलेली भाजप, 15 सदस्यांची युवा स्वाभिमान पार्टी आणि 11 सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांनी शहराच्या हितासाठी आणि बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लवचिक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर आपण युतीत सहभागी होत असल्याचे खोडके यांनी स्पष्ट केले, तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याची भावना राणा यांनी व्यक्त केली आहे. या अभूतपूर्व युतीमुळे महापालिकेतील सत्तेचा पेच सुटला असून अमरावतीच्या राजकारणाला आता नवी दिशा मिळणार आहे.

राजकीय शत्रुत्वापेक्षा वैयक्तिक ऋणानुबंध ठरले वरचढ

सत्ता समीकरणाचा नवा अध्याय अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अमरावतीच्या राजकारणाची गणिते वेगाने बदलली. आमदार खोडके यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द मानला, तर आमदार राणा यांनी ’दादांच्या’ पक्षाला सोबत घेऊन जुने मतभेद बाजूला सारले. यामुळे भाजपचा महापौर होण्याचा मार्ग सुकर झाला असून विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button