नववर्ष दिनी दाजीसाहेबांच्या तपोवनात अभिनंदन बँकेच्या कॅलेंडरचे प्रकाशन

अमरावती /5 जानेवारी : दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी तर्फे नववर्षाची पहाट तपोवनत हा पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन वंदन करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे 2026 चे अभिनंदन बँकेच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले व उपस्थित साधारणपणे 300 हुन अधिक मंडळींना ते कॅलेंडर व चॉकलेट प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई मातोश्री कमलताई गवई धीरूभाई सांगानी प्रा. प्रभाकर ढोमणे उषा करवा प्रभाताई आवारे डॉ. गोविंद कासार चंद्रकुमार जाजोदिया दिलीप भाई व हंसाबेन पोपट अभिनंदन बँकेचे अध्यक्ष एड. विजय बोथरा डॉ. शोभा रोकडे डॉ. निखिल जैन पी बी इंगळे कुसुमताई साहू लिलाबाई बोकरीया सुदर्शन गांग प्रदीप जैन अरुण कडू कव्हरीलाल ओस्तवाल शिवाजी देठे तेथे हजर होते.

संबंधित बातम्या

Back to top button