मीरा इंडस्ट्रीमध्ये अग्नितांडव, करोडो रुपयाचे नुकसान

चांदूरवाडी ग्राम पंचायत नाग मंदिर जवळील घटना

* 5 ठिकाणावरून बोलावल्या अग्नीशमन गाड्या

* शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

चांदूर रेल्वे/23 डिसेंबर : सोमवार रात्री दहापर्यंत मिलमध्ये चणाडाळ प्रोसेसिंग सुरू होती. त्यानंतर मिल मध्ये कामाला असलेले मजूर व मालक हे मिल बंद करून घरी गेले तर काही मजदूर मिलमध्ये असलेल्या कॉटरमध्ये घरात जाऊन झोपले थंडीचे दिवस असल्यामुळे ही आग केव्हा लागली हे कोणालाच कळले नाही परंतु मंगळवार सकाळी मिलमधून मालक पियुष गंगन यांना फोन आला व मिलमधून धुवा निघत असल्याची वृत्त कळले. सर्व्हे नंबर 117/3 मध्ये चना प्रोसेस करून चनाडाळ बनविणार्‍या मीरा इंडस्ट्रीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून अंदाजे 10 ते 12 करोड रुपयांचे नुकसान असल्याचे कळते. त्यावर त्यांनी आपले बंधू सचिन गंगन यांना फोन करून बोलावले व तसेच मिलमध्ये गेले मिलचे शटर उघडताच आत अग्नीचे रुद्र रूप व तांडव पाहतात त्यांचे अश्रू अनावर झाले.पियुष गंगन यांनी वडील किशोर गंगन यांना माहिती दिली व त्यांच्या लहान बंधू आयुष गंगन यांनी चांदुर रेल्वे पत्रकार व इतर सहकार्‍यांना फोन लावले व मिलमध्ये आग लागल्याची वार्ता सांगितली त्यावरून पत्रकार गुड्डू शर्मा यांनी स्थानिक अग्निशामक दल नगरपरिषद विभाग फोन लावून अग्निशामक दल ची गाडी बोलावली व सचिन गंगन, नितिन गंगन यांनी अमरावती, धामणगाव तर नगरपरिषद कर्मचारी जितू कर्से यांनी नांदगाव खंडेश्वर,तिवसा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशन निरीक्षक अजय आकरे व पोलिस दल घटना स्थळी दाखल होऊन परीस्थिती सांभाळी महसूल विभाग मंडळ अधिकारी निलेश स्थूल व इतर सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गावांतील सहकारी डॉ निलेश विश्वकर्मा, राजेश मुंधडा,बच्चू वानरे,पप्पू भालेराव,बंडू भूते,बडू मुंदडा, हर्षल वाघ,पप्पू सोळंके, बंडू आठवले, सुरज चौधरी, छोटु देशमुख, पवन ठाकूर, सचिन वर्मा, व व्यापारी राजू जालान तसेच गावातील समाजसेवक यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला. चना दाल प्रोसेसिंग मिल मीरा इंडस्ट्री मध्ये लागलेल्या आगीकरिता चांदुर रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर तिवसा अमरावती येथून अग्निशामक गाड्या बोलविण्यात आला या गाड्यांनी चांदुरलेले पंपास मधून अंदाजे 20 ते 25 फेर्‍या मारत आगीवर नियंत्रण आणण्याचा कसोटीने प्रयत्न करत आहे.

आगीमध्ये 10 करोड रुपयाचे नुकसान

मीरा इंडस्ट्रीमध्ये दैनिक 70 टन चण्यावर प्रोसेस करून चणाडाळ बनविले जाते दोन अडीच एकर मध्ये असलेल्या ह्या इंडस्ट्री मध्ये तीन फ्लोअर असल्याचे कळते तिन्ही फ्लोअर वर व खाली चना तसेच प्रोसेसिंग केलेला चणाडाळ असल्याचे समजते हे आगीचे रुद्र रूप व तांडव पाहता अंदाजे 10 ते 12 करोड रुपयाचे नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविल्या जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button