अंबादेवीच्या आशीर्वादाने महापालिकेत युतीचा शंखनाद

रवी राणांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमानचे नगरसेवक भक्तीरसात न्हाले

* शहराच्या विकासासाठी महायुतीचा सत्तेचा सोपान पूर्ण

अमरावती / 6 फेब्रुवारी नव्याने निवडून आलेल्या महापालिकेच्या पहिल्या आमसभेपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व 15 नगरसेवकांनी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात अंबादेवी आणि एकविरा देवीचे दर्शन घेऊन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. हिंदुत्वाचा जागर आणि शहराच्या विकासाचा संकल्प सोडत या लोकप्रतिनिधींनी देवीच्या चरणी माथा टेकवला. श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी आणि सचिन भेंडे यांची उपमहापौरपदी निवड करून दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
अमरावती महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आज नव्या सभागृहाचा श्रीगणेशा झाला. पहिल्या आमसभेला जाण्यापूर्वी आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमानच्या सर्व विजयी शिलेदारांनी ग्रामदैवत अंबादेवीची महाआरती केली. यावेळी संपूर्ण परिसर ’जय श्रीराम’ आणि ’भक्तीच्या’ जयघोषाने दुमदुमून गेला होता. रवी राणा यांनी यावेळी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवण्याचा जो शब्द दिला होता, तो आज पूर्ण झाला आहे. महायुतीचा धर्म पाळून शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे. या मंगलप्रसंगी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेता नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, प्राध्यापक प्रशांत आनंदराव वानखडे, सुमती ढोके, अजय मदनमोहन जयस्वाल, किशोर चंद्रशेखर जाधव, दीपक किसनलाल शाहू, नंदा धनंजय सावदे, रजनी राजेश डोंगरे, गौरी शैलेंद्र मेघवानी, अधिव्याख्याता प्रीती हर्षल रेवणे, महेश धरमराज मुलचंदानी, योगेश रघुनाथ विजयकर, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे या सर्व नगरसेवकांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, कमल किशोर मालाणी, उमेश ढोणे, संजय मुनोत, ज्योती सैरिसे, शैलेंद्र कस्तुरे, सोनू रुंगठा, पंकज शर्मा, विजय मलिक, संजय माहुलकर, प्रशांत कावरे, विलास वाडेकर, अविनाश काळे, देवा शेंडे, तापडिया, प्रदीप अलोणे, अजय घुले, बबनराव रडके, पराग चिमोटे, अण्णा कुंभलकर, करण देंडवाल, अशोक पांडे, भूषण पाटणे, मुश्ताक भाई, शुभम उंबरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेला शब्द पाळला

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती महापालिकेत युतीची सत्ता आणण्याचा शब्द दिला होता, तो आज सार्थ ठरला. हा क्षण अमरावतीच्या राजकारणासाठी ऐतिहासिक आहे. दिवंगत अजित दादांच्या इच्छेनुसार महापालिकेत महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले असून, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, अशी भावना आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button