बुद्ध जयंतीचा भव्य उत्सव सोहळा

जागतिक शांतता रॅलीचे आयोजन

अमरावती/23 एप्रिल– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी आणि तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती यानिमित्त पाच दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव आणि जागतिक शांतता रॅलीचे आयोजन 26 एप्रिलपासून करण्यात आले आहे. समन्वयक सुनील रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सवाचे हे 21 वे वर्ष असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर दुमदुमणार आहे. 26 एप्रिलला चित्रकला, रांगोळी स्पर्धा व बुद्ध-भीम गीत ऑडीशनने उत्सवाची सुरुवात होईल. 28 एप्रिलला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, खा. बळवंत वानखेडे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, उपविभागीय अधिकारी अनिल भातकर व गौतम वर्धन उपस्थित राहतील. त्याच दिवशी ’प्रबुद्ध समाज निर्मितीत प्रसार माध्यमांची भूमिका’ यावर परिसंवाद रंगणार असून, यात अ‍ॅड.कीर्ती ढोले, भूपेंद्र गुणवीर, राहुल गडपाले आणि अ‍ॅड. दिलीप एडतकर सहभागी होतील. 29 ला गायकांचा कार्यक्रम, तर 30 एप्रिलला रत्नाकर सेगट यांचे नाटक आणि प्रकाश मेट्राम यांचा नृत्य अविष्कार सादर होईल. 1 मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य जागतिक शांतता रॅली निघेल. गुणवंत देवपारे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन होईल.

संबंधित बातम्या

Back to top button