एच.के.एम.उर्दू हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

वरुड /13 सप्टेंबर – स्थानिक मील्लत सोशल वेल्फेअर असोसिएशन शेंदूरजनाघाट द्वारा संचालित एच.के.एम.उर्दू हायस्कूल येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वयंशासित विद्यालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यालयातील अब्दान आदील अब्दुल कलीम, हजीरा आफरीन मोहम्मद नईम शेख, मो.उजैर अब्दुल माजिद, फातिमा सारिया, जुबिया कौसर, फजीलाअनम, गौसिया नाज, आलिया वसीमशा अदिबा कौसर, माहिन नाज, आलिया जरीन, आयेशा सिद्दीका, सना फिरदोस, अक्सा फातेमा, अदीबा नाजीमखान, अजरा जमील, ईशरा आमिर, अश्मीरा सदफ, तंजीला सिद्दीक, लिमा मो.निसार, नवेरा, नबीला मरशदा, हम्माद खान, अर्शदखान इत्यादींनी शिक्षकांची वेशभूषा धारण करुन शिक्षकांची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत कार्यक्रमाचे नियोजन तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे सादरीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने केले तसेच शिक्षकांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात हुजेफ अहमद, रोजीया तबसुम, निसबा कौसर, आलिया फिरदोस, अलिशबा फातिमा, अश्फिया खानम, माहीन कौसर, फिरदोस फातिमा, सैफखान,तंजीला अंजूम या विद्यार्थ्यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी माहिती तसेच शिक्षकांप्रतींच्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. सय्यद सादिक, मिर्झा शहजाद अख्तर, नईम अहमद, फरीदा यास्मिन इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नईम शेख जरूडकर होते.तर अब्दुल कलीम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार फजीला वसीमशाह व जुबिया कौसर यांनी केले. नाझीम खान व तौफिक अहमद यांचे कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सहकार्य लाभले.

Back to top button