सुरेश व सरला करवा दांपत्याचे होतकरू विद्यार्थ्याना सहकार्य

अमरावती /22 मार्च : शहरातील राष्ट्रसंत भक्त तारेकर परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले. राष्ट्रसंतांच्या 57 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मोर्शी रोड येथील राष्ट्रसंत प्रार्थना भवन येथे लक्ष्मण दास काळे महाराज यांच्या काल्याचे किरन व विविध कार्यक्रम असे स्वरूप होते. या कार्यक्रमास एक भाग म्हणून तारेकर परिवारातील प्रकाश तारेकर यांच्या पुढाकाराने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यास दिल्या जाणार्‍या सहकार्य कॅम्प परिसरातील रहिवाशी सुरेश व सरला करवा या दांपत्यायही सहकार्य लाभले. निधी प्रदान प्रसंगी काळे महाराज रामदास सालके प्रमोद पोकळे प्रकाश तारेकर डॉ. गोविंद कासट रमेश सिंह व शोभा गौतम ही मंडळी हजर होती कार्यक्रमाचे संचालन आभार प्रकाश तारेकर यांनी मांडले.

संबंधित बातम्या

Back to top button