गुढीपाडव्यानिमित्त रामानंद संप्रदायातर्फे शोभायात्रा

अमरावती /22 मार्च  : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या अमरावती जिल्हा वतीने गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती जिल्ह्यासाह यवतमाळ पश्चिमसह महाराष्ट्र गुजरात तेलंगणा व कर्नाटक या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरूश्रीरींच्या प्रतिमेचे रथामध्ये पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शोभा यात्रेत सहभागी सर्व भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली होती.कलशधारी महिला, निशानधारी महिला व पुरुष, भजनी मंडळ,लेझीम पथक,राम पंचायतन, विशेष आकर्षण राम पंचायतन, विशेष आकर्षण हे या शोभायात्रेचे आकर्षण ठरले.रथात यजमान म्हणून डॉ.उघडे हे जोडपे उपस्थित होते. या शोभायात्रेत सर्व वयोगटातील तरुण तरुणी पुरुष व महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.या शोभायात्रेत जिल्हा सेवा समिती अमरावती मधील जवळजवळ 300 च्या वर भक्तगण उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल धोटे यांनी दिली. या शोभा यात्रेसाठी पीठ समिती सदस्य, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी, युवा सेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, सेवा केंद्र कमिटी आरती समितीचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप गुरुमाऊलींची सांगता आरती घेऊन गाडगे महाराज मंदिर समोर च्या प्रांगणात झाला.आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यांच्यासह युवा सेना,हिंदू संग्राम सेना, महिला सेना, जिल्हा व तालुका कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button