बडनेरा येथील लता फिटनेस वर्ल्डचे आ.रवि राणा यांच्याहस्ते उद्घाटन
महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

अमरावती /22 मार्च : बडनेरा येथील नवीवस्ती परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ‘लता फिटनेस वर्ल्ड’ या व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार रवि राणा यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला महापौर श्रीचंद तेजवानी, युवा स्वाभिमान पार्टीचे गटनेते नाना आमले, नगरसेवक अजय जयस्वाल, नगरसेवक किशोर जाधव, नगरसेविका रंजनी डोंगरे, नगरसेविका गौरी मेघवानी तसेच बॉडी बिल्डर आयकॉन मनिष पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते, त्यामुळे व्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.बडनेरा नवीवस्ती सारख्या भागात ‘लता फिटनेस वर्ल्ड’ सारखी सुसज्ज व्यायामशाळा सुरू होणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. येथील युवकांनी मोबाईल व इतर व्यसनांपासून दूर राहून व्यायामाकडे वळावे, असे आ.रवि राणा यांनी आवाहन केले. प्रत्येक परिसरात अशा व्यायामशाळा उभारल्या गेल्या, तर आपला समाज अधिक सक्षम, निरोगी आणि सशक्त बनेल. शासन स्तरावरही क्रीडा व फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सुध्दा आ.रवि राणा यांनी बोलतांना सांगीतले. या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवीन पिढीला शारीरिक तंदुरुस्तीची सवय लागावी, यासाठी अशा व्यायामशाळांची आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने युवक-युवतींना योग्य व्यायामाची दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी जितु मोटवानी, गजानन सावंन, शैलेश मेघवानी, किशोर पिवाल, मुस्ताकभाई, प्रा.अमोल मिलके, पंकज शर्मा, राजु दामले, किशन कोतवानी, पवन भांडने, काळबांडे साहेब, सचिन पवार, हरभजनसिंग, पवन भोयर, अतुल नाचनकर, संगीता बैरमैय्या, वंदना पवार, पुजा दुबे, राज भैरव व असंख्य नागरीक उपस्थितीत होते.




