उभ्या ओम्नी गाडीने घेतला अचानक पेट

गुरुकुंज मोझरीतील घटना

तिवसा /3 नोव्हेंबर  : तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील महावितरण कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या मारुती ओमनी चारचाकी वाहनाला सोमवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत गाडी जळून पूर्णपणे खाक झाली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.एम एच 29एन 9278क्रमांकाची ओम्नी गाडी वंदना सुधीर गवई (रा. खेरी धानोरा, जिल्हाअमरावती) यांच्या मालकीची होती. घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन व तिवसा पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचार्‍यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान तिवसा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

Back to top button