रवींद्र चव्हाण यांची अडसड यांच्या निवासस्थानी भेट

संघटनात्मक बांधणीसह स्थानिक राजकारणावर चर्चा, ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अमरावती /30 सप्टेंबर– भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावती दौर्‍यात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण अडसड यांच्या गणेशीवाला परिसरातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी, स्थानिक राजकारण आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अडसड कुटुंबीयांनी चव्हाण यांचे स्वागत केले. या भेटीला खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रताप अडसड, नगराध्यक्षा अर्चना राठोड अडसड यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती दौर्‍यावर आलेले रवींद्र चव्हाण यांनी अरुण अडसड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी अरुण अडसड यांचा आशीर्वाद घेतला. अडसड कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक पातळीवर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे, संघटनेच्या विविध उपक्रमांना गती देणे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती यावरही विचारविनिमय झाला. या भेटीला खा. डॉ. अनिल बोंडे, धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रताप अडसड, धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना राठोड अडसड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि अडसड कुटुंबीय उपस्थित होते. जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक प्रश्नांबाबत नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या भेटीमुळे पक्षातील जुन्या आणि नव्या नेतृत्वातील संवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीची चर्चा पक्षाच्या स्थानिक वर्तुळात सुरू आहे.

Back to top button