समाजातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा नवा उपक्रम

ओसवाल जैन कुटुंब संपर्क सूचीचे थाटात प्रकाशन

आ.रवी राणा आणि अशोक बंबोरिया यांची उपस्थिती

अमरावती /19 नोव्हेंबर- ओसवाल जैन समाजातील प्रत्येक कुटुंब एकमेकांच्या संपर्कात राहावे, समाजातील एकोपा वाढावा आणि परस्परांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘ओसवाल जैन परिवार अमरावती संपर्क सूची 2027’चे आ.रवी राणा आणि अशोक बंबोरिया यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले. भारतीय जैन संघटना (बीजेएस) अमरावतीचे अध्यक्ष शुभम जैन यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाचे समाजबांधवांनी स्वागत केले. केवळ संपर्क क्रमांकांची माहिती देणारी ही सूची नसून संपूर्ण ओसवाल जैन समाजाला एकत्र जोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक कुटुंबाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, एकमेकांशी संपर्क साधणे सोपे व्हावे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सर्वांचा सहभाग वाढावा, या विचारातून शुभम जैन यांनी या संपर्क सूचीची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून, समाजातील कुटुंबांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला बडनेराचे आ. रवी राणा, अशोक बंबोरिया, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अमृत मुथा, ओसवाल संघाचे अध्यक्ष अनिल बोथरा, प्रतिदिन समाचार पत्राचे प्रवीण आहुजा, जयराम आहुजा, विश्वास आहुजा, बीजेएसचे विश्वस्त सुदर्शन गांग, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष सीए विजय बोथरा, दादावाडी संस्थानचे अध्यक्ष भरत खजांची, महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन उपस्थित होते. याशिवाय अंकित बंबोरिया, सीए श्रेणिक बोथरा, संजय आंचलिया, प्रदीप जैन, डॉ. गोविंद कासट, चंदू सोजतिया, महेंद्र गांधी, प्रकाश बोकाडिया, राजेश बोकाडिया, संजय मुनोत, नितेश गांग, प्रकाश बेद, संजय बोकाडिया, महेंद्र गुगलीया, प्रेम बोकाडिया, रजनीश कोठारी, अभय कोटेचा, परेश शाह, चेतन कोटेचा, पन्ना ओस्तवाल, मानक ओस्तवाल, विपिन निबजिया, सुरेश मुनोत यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक आणि समाजबांधव उपस्थित होते.

Back to top button